मराठी निबंध क्र.4

माझी उन्हाळातील सुट्टी
Summer Vacation Essay Marathi

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा

माझी उन्हाळातील सुट्टी

My Summer Vacation Essay Marathi 500 words

माझी उन्हाळातील सुट्टी | उन्हाळातील सुट्टी | उन्हाळातील सुट्टीतील धमाल | निबंध 200 शब्द 400 शब्द 500, 800 शब्द

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा :
गावाची मजा

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा: My Summer Vacation Essay Marathi :दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही माझे एप्रिल महिन्यातील पेपर झाले व सुट्टी लागली ह्या सुट्टीमध्ये मी खूप धमाल केले, मामाच्या गावाला गेलो, परराज्यात फिरायला गेलो, देशाची राजधानी पहिली आणि खूप मज्जा केली.

शाळेला सुट्टी लागल्याची मजाच फार वेगळी असते, कधी सुट्टी लागनार आणि कधी मी फिरायला जाणार हे विचार परीक्षेच्या वेळी अभ्यास करतांनाही मनात येत असता. ह्या वर्षी सुट्टी लागली आणि मी मामच्या गावाला फिरायला गेलो, माझ्या सोबतच माझी आई आणि माझा लहान भाऊ हेही होते.

माझे मामाचे गाव मला खूप आवडते, गावच्या बाजूने नदी वाहते, तेथे जवळच मामांची शेती आहे, शेती मध्ये विहीर सुद्धा आहे. गावला गेल्यावर तिथे पाळीव प्राणीही पहावयास मिळते.

तसे पहिले तर एप्रिल महिना व मे महिना हे प्रचंड उष्म असतात, ह्या दिवसात गरम फार जास्तच होते, परंतु ह्या प्रचंड गरमीतही सुट्टीची मज्जाच फार वेगळी असते. माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा हि तशी निराळीच होती.

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा :
वाढते तापमान

ह्या वर्षी तापमान जरा जास्तच होते, आह्मी ह्या दिवसात पाणी जास्त पिणे हा नियमच बनविला होता, व शक्य नसेल तर दुपारच्या वेळी घराच्या बाहेर न जाणे हेच आह्मी पसंत करत होतो मग घरात बसून सर्वांनी मिळून खेळ खेळणे, चित्रपट पाहणे इत्यादी क्रिया करीत होतो.

ह्या सुट्ट्यांमध्ये आह्मी आपल्या देशाची राजधानी “दिल्ली” येथे फिरयलाही गेलेलो होतो, तेथे आह्मी लाल किल्ला पहिला, अतिशय छान वाटले आह्मी एक दिवस दिल्ली येथे मुक्काम करून बाकीचेही प्रेक्षणीय स्थळ पहिले व नंतर तिथून परत मामच्या गावाला परत आलो. एकंदरीत दिल्लीतील तापमानही फार जास्तच होते. मनात विचारहि आला कि तापमान वाढ होण्यामागे कारणे काय आहेत? ह्या सर्व गोष्टीना माणूसच जबाबदार आहे का? तापमानवाढीवर काही पर्याय आहेत का? आपण सर्वांनी मिळून काय केले तर तापमानात होणारा हा प्रचंड बदल आपण कमी करू शकतो? आपल्याला ह्या सर्व विषयांचे चिंतन करणे फार महत्वाचे आहे.

रात्री मी जेवण करून झाल्यावर घरचा आभ्यासही करायचो, गणिताचे फोरमुले समजावून घेणे, मराठीचे निबंध लिहणे आणि वर्तमानपत्र वाचणे हे सर्वहि मी केले त्यामुळे दिवस कसा गेला हेही मला समजायचे नाही.

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा :
सुट्टीचा उपयोग

ह्या सुट्टीमध्ये मी एका चित्रकला कार्यशाळेत प्रवेश घेतला जिथे मी नवीन माहिती शिकलो आणि माझ्या कलात्मक कौशल्यांचा यात विकास झाला. चित्रकलेच्या कृतीने मला स्वतःला दैनंदिन जीवनातील तणावातून उपचारात्मक सुटका मिळाली. प्रत्येक ब्रश स्ट्रोक माझ्या अंतःकरणातील विचार आणि भावनांचा एक पुरावा होता आणि कलाकृतीचे अंतिम तुकडे माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तयार केलेल्या आठवणींचे स्मरण म्हणून काम करत होते. माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा मध्ये मी अशी माझी सुट्टीत मज्जा केली.

सर्व उत्साहाच्या दरम्यान, मी विश्रांती आणि स्वत: ची काळजी घेण्यासाठीसुद्धा वेळ काढला. नदीकिनारी आरामात घालवलेले आळशी दिवस, विहिरीत मारलेल्या उद्या, उंच झाडांच्या सावलीत कादंबऱ्या वाचणे यातच गुंतल्याने माझे मन, शरीर आणि आत्मा पुन्हा टवटवीत झाला.

माझी उन्हाळी सुट्टी जवळ आल्यावर, मी नवीन उर्जा आणि उद्देशाने घरी परतलो. मला आलेले अनुभव आणि मला भेटलेल्या लोकांनी माझे जीवन अशा प्रकारे समृद्ध केले ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. मग ते निसर्गाचे चमत्कार शोधणे असो, मित्रांसोबत जोडले जाणे असो,माझी उन्हाळी सुट्टी हा वाढीचा, शोधाचा आणि अविस्मरणीय क्षणांचा काळ होता

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा :
निष्कर्ष

जसजसा उन्हाळा जवळ येऊ लागला, आणि माझी सुट्टी संपत गेली तसतसे माझ्या आठवणी आणि अनुभवांवर विचार केला. ह्या सुट्टीमध्ये नवनवीन कामे केली, निसर्गासोबत आनंद लुटला, धमालहि केली आता वेळ होती नवीन येणाऱ्या शेक्षणिक वर्षाची तयारी करण्याची माझा परीक्षेचा निकाल हि लागेलेला होता, आता लक्ष पुढील वर्षाकडे, माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीने मला विश्रांती आणि उत्साहाचा परिपूर्ण समतोल प्रदान केला, ज्यामुळे मला ताजेतवाने वाटले आणि पुढील वर्षातील आव्हाने स्वीकारण्यासाठी मी तयार झालो.
summer vacation essay in marathi